महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Water Supply Cut : मंगळवारी कांदिवली बोरिवली दहिसर व मालाडमध्ये पाणी पुरवठा बंद

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वतीने ३१ मे ते १ जून या कालावधीत जलवाहिनीचे काम केले जाणार आहे. यामुळे कांदिवली, बोरिवली, दहिसर व मालाड (Kandivali Borivali Dahisar and Malad) या विभागात पाणी पुरवठा बंद (Water supply cut off) राहणार आहे. या कालावधीत पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Water Supply Cut
पाणी पुरवठा बंद

By

Published : May 27, 2022, 9:30 PM IST

मुंबई:बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे कांदिवली - पूर्व येथील लोखंडवाला वसाहतीत १८०० मिलीमीटर जलवाहिनीसोबत १५०० मिलीमीटर जलवाहिनी जोडण्याचे काम व ठाकूर व्हिलेज येथे १८०० मिलीमीटर जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता सुरु होऊन ते बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

यामुळे या कालावधीत कांदिवली - पूर्व, बोरिवली - पूर्व, दहिसर -पूर्व आणि मालाड - पूर्व परिसरांमध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. संबंधीत परिसरातील नागरिकांनी या कालावधीत अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा : Sunday Mega Block : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

ABOUT THE AUTHOR

...view details