मुंबई- जागृती नगर मेट्रो स्थानकाजवळील शिवसेना शाखेसमोर आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पाण्याचे वॉल्व्ह बंद केले. मात्र, तोवर भटवाडी, घाटकोपर आणि अंधेरीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
मुंबईतील जागृती नगर मेट्रो स्थानकाजवळ जलवाहिनीला गळती, लाखो लिटर पाणी वाया हेही वाचा -'भीम आर्मी म्हणते.. नागरिकांपेक्षा मोठं नाही सरकार, एनआरसी मागे घ्यावा लागेल'
जागृती नगरमध्ये नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, ती टाकल्यानंतर रस्ता मजबुतीकरण केले गेले नाही. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांच्या दाबामुळे ही जलवाहिनी फुटली असे प्राथमिकरित्या दिसून येत आहे. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम पालिका कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे.
हेही वाचा -VIDEO: डोनाल्ड ट्रम्प बाहुबलीच्या वेशात.....खुद्द ट्रम्प यांनी शेअर केला मजेशीर व्हिडिओ
मुंबई उपनगरांमध्ये मागील काही दिवसांपासून जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. मेट्रोच्या कामांमुळे तसेच जलवाहिनी बदलणे, केबल टाकणे, या कामांमुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहे.