महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझगाव येथे जलवाहिनी फुटली; लाखो लीटर पाणी वाया

माझगाव येथील झमझम मिठाईवाला, जुवेरिया अपार्टमेंटसमोर भूमिगत २४ इंचाची जलवाहिनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक फुटली. जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला भेगा पडून रस्त्यावर मोठा खड्डा पडला.

By

Published : Mar 20, 2019, 9:30 AM IST

फुटलेली जलवाहिनी

मुंबई - भायखळा माझगाव येथील जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. जलवाहिनी फुटल्याने या विभागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला.रात्री उशिरापर्यंत काम करून सकाळी या विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेच्या जल विभागाने कळविले आहे.

माझगाव येथील झमझम मिठाईवाला, जुवेरिया अपार्टमेंटसमोर भूमिगत २४ इंचाची जलवाहिनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक फुटली. जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला भेगा पडून रस्त्यावर मोठा खड्डा पडला. फुटलेल्या जलवाहिनीमधून लाखो लीटर पाणी वाया गेल्याने विभागातील नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाली. जल विभागाला याची माहिती मिळताच युद्ध पातळीवर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या विभागाचा पाणी पुरवठा बुधवार सकाळपासून सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या जल विभागाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details