मुंबई - शहरात सकाळपासून कोसळत असलेल्या पावसाने काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. निसर्ग चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून आज सकाळपासून मुंबईला पावसाने झोपडले यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. आता दिवस ओसरल्यानंतर पावसाने आता विश्रांती घेतली असून पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पहिल्याच पावसात वांद्रे खेरवाडी परिसरातील सखल भागात साचले पाणी - mumbai rain updates
शहरात आज सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील वांद्रे खेरवाडी परिसरातील सखल भागात पाणी साचले. मुंबईत पाऊस थांबला तरी काही सखल भागातील पाण्याचा निचरा झालेला नाही. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाण्यातूनच वाट काढत मार्गक्रमण करावे लागले.
शहरात आज(गुरुवार) सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील वांद्रे खेरवाडी परिसरातील सखल भागात पाणी साचले. मुंबईत पाऊस थांबला तरी काही सखल भागातील पाण्याचा निचरा झालेला नाही. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाण्यातूनच वाट काढत मार्गक्रमण करावे लागले. मुंबई पालिकेने पावसाळा पूर्व काम हाती घेतली असली तरी, पहिल्या पावसाळ्यात सखल भागात पाणी साचल्याने येणाऱ्या काळात पावसात इथे दरवर्षीप्रमाणे पाणी साचण्याची शक्यता आहे. या पावसामुळे, पावसामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. बुधवारपेक्षा मुंबईत गुरुवारी पावसाचा जोर वाढला असून आजचे वातावरण पाहता मुंबईत आणखी पाऊस येण्याची शक्यता आहे.