मुंबई- शहरासह उपनगरात आजही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. परिणामी अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी भरले आहे. त्याचप्रमाणे घाटकोपर मेट्रो स्थानकाखालीदेखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना तेथून ये-जा करण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे.
घाटकोपर मेट्रो खाली पाणीच पाणी.., प्रवाशांची तारांबळ - Kurla
शहर व उपनगरात सलग कोसळत असलेल्या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.

घाटकोपर मेट्रो स्थानकाचे दृष्य
घाटकोपर मेट्रो स्थानका खाली मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले
शहर व उपनगरात सलग कोसळत असलेल्या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. सकाळी मध्य रेल्वेच्या सायन, कुर्ला, कांजूरमार्ग, भांडुप येथे रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी भरले असल्याने रेल्वे सेवा तात्पुरती ठप्प झाली आहे.