मुंबई- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने जलवाहिनेची महापालिकेकडून दुरुस्ती केली जाणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे महालक्ष्मी आणि मुंबई सेंट्रल भागातील पाणी पुरवठा गुरुवारी 10 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार आहे. याचा फटका महापालिकेच्या नायर आणि कस्तूरबा या रुग्णालयांनाही बसणार आहे.
हेही वाचा - पीएमसी बँक आर्थिक घोटाळा : बँकेचे माजी संचालकाला माहिम येथून अटक
रेसकोर्स, हाजीअली येथील मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून कामाला सुरुवात होणार आहे. तब्बल 2 दिवस काम चालणार असल्याने मुंबई सेंट्रल आणि महालक्ष्मी भागातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होईल. तुकाराम जावजी मार्ग, ताडदेव मार्ग, साने गुरुजी मार्ग, तुळशीवाडी, आंबेडकर नगर, मुंबई सेंट्रल व महालक्ष्मी रेल्वे स्टेशन, स्लेटर रोड, ताडदेवचा आसपास भाग, गमदिया कॉलनी सदर भागांमधे गुरुवारी सांयकाळी 7.30 ते रात्री 9 वाजेपर्यंत तर शुक्रवारी महापालिकेच्या नायर आणि कस्तुरबा गांधी रुग्णालय भागात 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही.
हेही वाचा - प्रदेश युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस
पाणीकपातीमुळे रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी अगोदरच्या दिवशी पुरे पाणीसाठा करावा. तसेच काटकसरीने पाणी वापरावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका जलविभागाने केले आहे.