महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वॉचमनच्या मुलीचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; भांडुपमधील भाग्यश्रीवर कौतुकाचा वर्षाव - ssc board result 2020

बुधवारी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये मुंबईतील एका छोट्याशा खोलीत राहणाऱ्या भाग्यश्रीने घवघवीत यश मिळविले आहे. तिच्या घरची परिस्थिती हलाखीची असतानाही तिने मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले जात आहे.

ssc result
वॉचमनच्या मुलीचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; भांडुपमधील भाग्यश्रीवर कौतुकाचा वर्षाव

By

Published : Jul 30, 2020, 8:30 AM IST

मुंबई -मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर भांडुप येथील 10 बाय 15 च्या घरात राहणाऱ्या भाग्यश्री गावडेला दहावीच्या परीक्षेमध्ये 98.80 टक्के मिळाले आहेत. तिच्या या यशानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाग्यश्री ते 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण भांडुपमधील अमोर कोर विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेतून झाले. ती सध्या भांडुपकरांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. भाग्यश्रीचे वडील वांद्रे येथील सारस्वत बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. हनुमान नगर येथे दहा बाय पंधराच्या छोट्या खोलीत भाग्यश्री तिचे आई-वडील आणि मोठा भाऊ राहतात.

अतिशय कठीण परिस्थितीत तिने प्रचंड मेहनत घेऊन हे यश मिळविल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाग्यश्रीने दहावीचा अभ्यास दिवसभर शाळा त्यानंतर खासगी क्लासेस आणि रात्री ५ ते ६ तास अभ्यास केला. तिच्या या प्रचंड मेहनतीला कुटुंबाने ही मोठे सहकार्य केले. भाग्यश्रीचा आवडता विषय गणित असून तिने गणितात दहावीला ९८ गुण मिळविले आहेत. तिला वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा असून, तिची भविष्यात प्राध्यापक होण्याची इच्छा आहे. तिच्या या यशाचे संपूर्ण भांडुपकरांसह, अमर कोर शाळेतील शिक्षक आणि कुटुंबाने ही कौतुक केले आहे.

मी केलेल्या अभ्यासाचे मला या टक्क्यांच्या रूपातून फळ मिळाले. कोरोनाच्या पाश्वभूमीवर हा आनंद मित्र व नातेवाईकांबरोबर वाटता नाही आला. मात्र, ज्यांनी मला घडवलं त्या आई वडिलांबरोबर हा आनंद साजरा केला आहे. भविष्यात मला प्राध्यापक बनायचे आहे असे भाग्यश्नीने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details