मुंबई- पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील 24 तासात हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची माहिती आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा तसेच कोकणात काही जागी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरूच आहे. आता हवामान विभागाने राज्यात पुढील 8 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, रविवारी राज्यात वीज पडून 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात पुढील आठ दिवस मुसळधार पावसाचा इशारा!
हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या मते, उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे बऱ्याच राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) नुसार, उपग्रह-आधारित छायाचित्रे आणि तेथील जहाजे आणि समुद्रातील संकेतावरून दिसून आले की, काल पूर्व-मध्य प्रदेशात कमी-दाबाचे क्षेत्र तयार झाले. यासोबतच दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागराशेजारील पश्चिम बंगालच्या उपसागरात दबाव क्षेत्र तयार होत आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, आज दबाव क्षेत्र पश्चिम-वायव्येकडे सरकेल व उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीवरील नरसपूर व विशाखापट्टणम पार करेल.
13 ऑक्टोबर 2020 रोजी किनाऱ्यावरील ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज पश्चिम बंगालच्या पश्चिमोत्तर भागात आणि त्याला लागूनच पश्चिम, बंगालच्या दक्षिण-पश्चिमी भाघात 50 से 60 किमी प्रति घंटा वेगाने वारे वाहू शकतात. तसेच आंध्र प्रदेश किनारपट्टी ओडिशा, तामिळनाडू आणि पुडुचेरी किनारपट्टीवर 55-65 किमी प्रति घंटा वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे समुद्रतटावरील नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना देखील सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.