महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुख्यात गुंड एजाजच्या मुलीला अटक, एजाजपर्यंत पोहोचण्यासाठी मुलीची चौकशी सुरू - sonia adwani lakadwala daughter

27 डिसेंबर रोजी सोनिया आपल्या दीड वर्षाच्या मुलासोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नेपाळला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने तिचा ताबा मिळवला आणि तिला बेड्या ठोकल्या.

mumbai
कुख्यात गुंड एजाजच्या मुलीला अटक

By

Published : Dec 29, 2019, 7:06 AM IST

मुंबई- एजाज लकडावाला यांची मुलगी आपल्या दीड वर्षाच्या मुलासोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नेपाळला जाणार होती. मिळालेल्या माहितीनुसार नेपाळहून ती दुबईला जाण्याची शक्यता होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला एजाजची मुलगी मुंबई विमानतळावरून जात आहे, अशी माहिती मिळताच पोलिसांनी विमानतळावरून तिला ताब्यात घेतले आणि बेड्या ठोकल्या.

माहिती देताना मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त शहाजी उमप

अटक केलेली आरोपी सोनिया आडवाणी म्हणजेच एजाजची मुलगी ही बनावट पासपोर्टच्या आधारे देश सोडून परदेशात जाणार होती. पासपोर्ट काढण्यासाठी तिने दिलेली सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तिला अटक करून हॉलीडे कोर्टात हजर केले असता तिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, खंडणी उकळण्याच्या प्रकरणात सोनिया हिचासुद्धा काही हात होता का, आणि ती देश सोडून कुठे जाणार होती, अशा असंख्य प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून तिची चौकशी केली जाणार आहे, असे मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त शहाजी उमप यांनी सांगितले.

कुख्यात गुंड एजाज लकडावाला सध्या परदेशात लपून बसला आहे. मुंबई पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण परदेशात लपून बसल्यामुळे पोलिसांचा हाथ त्याच्यापर्यंत पोचत नव्हता. मात्र, तरीसुद्धा आपल्या हस्तकाद्वारे व्यापाऱ्यांकडून तो खंडणी उकळण्याचे प्रयत्न करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. खार येथील एका व्यापाराला धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. यानुसार खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने खंडणी मागणारा गँगस्टर एजाज लकडावाला, त्याचा भाऊ अखिल लकडावाला याला या आधी अटक केलेली होती.

सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना अखिल लकडावाला याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गँगस्टर एजाजची मुलगी ही खंडणीमध्ये सामील आहे, असे पोलिसांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले. त्यानुसार लकडावाला यांची मुलगी सोनिया मनीषा अडवानी (लग्नानंतरचे नाव) हिच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस बजावण्यात आली. 27 डिसेंबर रोजी सोनिया आपल्या दीड वर्षाच्या मुलासोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नेपाळला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने तिचा ताबा मिळवला आणि तिला बेड्या ठोकल्या, असे मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त शहाजी उमप यांनी सांगितले.

हेही वाचा-आझाद मैदानात तरुणांचा एनआरसी व सीएए विरोधात एल्गार

ABOUT THE AUTHOR

...view details