मुंबई : Wankhede Stadium Security : सध्या देशात क्रिकेट विश्वकपला सुरुवात झाली (NIA Threat Email) आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा एजन्सीला धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. या ईमेलमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Threat to kill PM) यांची हत्या आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये स्फोट (Blow up Narendra Modi stadium) घडवून आणण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. ईमेलमध्ये 500 कोटी रुपयांची रक्कम मागितली असून, सध्या तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्सची सुटका करण्याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.
मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी :अटकेत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या सुटकेची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तत्काळ मुंबई पोलिसांना धमकीच्या ईमेलची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे एनआयएने ईमेलमधील मजकूर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या संबंधित सुरक्षा यंत्रणांकडे पाठविला आहे. मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर आगामी पाच विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. धमकी देणाऱ्या ईमेलचा मूळ स्रोत शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सक्रियपणे काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बिश्नोई गँगरची धमकी? : महत्वाचे म्हणजे बिश्नोई 2014 पासून तिहार तुरुंगात आहे. मात्र, तो तुरुंगातून आपली टोळी चालवत असल्याचे समजते. पंजाबमध्ये त्याच्यावर पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येसह अनेक खटले प्रलंबित आहेत. बिश्नोईने यापूर्वी मूसेवालावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि काळवीट शिकार प्रकरणी बॉलीवूड अभिनेता सलमान खानला तुरुंगातून जीवे मारण्याची धमकी दिली होती.