मुंबई- शहरात पडणारा पाऊस मुंबईकरांसाठी धोकादायक ठरत असून अनेक जीवघेण्या दुर्घटना घडत आहेत. आजही प्रभादेवी येथील राधिका अपार्टमेंटची संरक्षक भिंत दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाजूला असलेल्या भगवानदास वाडीमध्ये कोसळली. यामुळे या वाडीत असलेल्या दोन घरांचा बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता. यामुळे संध्या गुप्ता आणि सुनीता गुप्ता या दोन महिला तब्बल एक तास घरात अडकून पडल्या होत्या. अग्निशमन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी या भितींचा मलबा बाजूला करत या दोन्ही महिलांना बाहेर काढले.
प्रभादेवी येथील इमारतीची संरक्षक भिंत कोसळली; दोन महिला घरात अडकल्या - Radhika apartment prabhadevi
प्रभादेवी येथील राधिका अपार्टमेंटची संरक्षक भिंत दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाजूला असलेल्या भगवानदास वाडीमध्ये कोसळली. यामुळे या वाडीत असलेल्या दोन घरांचा बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता.
भादेवी येथील इमारतीची संरक्षक भिंत कोसळली
या घटनेत घरात अडकलेल्या संध्या गुप्ता यांनी सांगितले की, घरकाम करत असाताना अचानक आवाज आला. सुरुवातीला काही कळाले नाही नंतर बघितले तर भिंत पडलेली दिसली. आम्हाला बाहेर जायला जागा नव्हती. मग आम्ही आजूबाजूला हाक मारली. यानंतर आमच्या चाळीतील लोकांनी अग्निशमन दलाला बोलवले आणि आम्हाला बाहेर काढले.
Last Updated : Aug 2, 2019, 5:41 PM IST