मुंबई :मार्च 2023 मध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमैया यांनी आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक मार्गावरील दोन लाख स्क्वेअर फुट क्षेत्रफळाचे मैदान बेकायदेशीररित्या हडप केले असल्याची तक्रार केली होती. ही तक्रार मुंबईच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. हे सार्व आरोप निराधार असल्याचे, रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेने त्या तक्रारीच्या आधारे पंचतारांकित हॉटेलची दिलेली अनुमती रद्द करत असल्याचा आदेश जारी केला. त्या विरोधात आमदार रवींद्र वायकर यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर आव्हान दिले आहे.
लहान मुलांसाठी मैदान राखीव :मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे असलेले हे मैदान होते. हे मैदान लहान मुलांच्यासाठी खेळण्यासाठी म्हणून ते महापालिकेने आरक्षित केले होते. परंतु लहान मुलांसाठी मैदान हे रवींद्र वायकर यांनी बेकायदेशीररित्या हडप केले. तक्रारीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेवर असताना हा कारभार झाल्याचे म्हटले आहे. मुलांसाठी असलेले महापालिकेचे राखीव मैदान है दुसऱ्याच कामासाठी वापरले असल्याची ही तक्रार आहे. मात्र या सर्व तक्रारी अमान्य करत वायकर यांनी हे आव्हान उच्च न्यायालयात दिले आहे.