मुंबई - शहरात मागील दीड दशकांपासून कार्यरत असलेल्या वाघेरी ग्रामविकास मंडळ या सामाजिक संस्थेकडून सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. मुंबईतील वाघेरी ग्रामस्थ आणि त्यांच्या सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू, कपडे, अन्नधान्य, शालेय वस्तू आदी साहित्य पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.
वाघेरी ग्रामस्थ मंडळाचाही पूरग्रस्तांना मदतीचा हात; मुंबईस्थित गावकऱ्यांचेही योगदान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात वाघेरी हे गाव आहे. या गावातील गावकऱ्यांनी एकत्र येऊन 'वाघेरी ग्रामविकास मंडळाची मागील दीड दशकापूर्वी स्थापना केली आहे. या मंडळाचे सदस्य म्हणजेच वाघेरी येथील ग्रामस्थ हे मुंबईतील भांडुप, मुलुंड, घाटकोपर, विक्रोळीपासून ते मालाड, कांदिवली, बोरीवली या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात वाघेरी हे गाव आहे. या गावातील गावकऱ्यांनी एकत्र येऊन 'वाघेरी ग्रामविकास मंडळाची मागील दीड दशकापूर्वी स्थापना केली आहे. या मंडळाचे सदस्य म्हणजेच वाघेरी येथील ग्रामस्थ हे मुंबईतील भांडुप, मुलुंड, घाटकोपर, विक्रोळीपासून ते मालाड, कांदिवली, बोरीवली या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. आपली नोकरी आणि रोजगार सांभाळून वाघेरी ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. याच पार्श्वभूमीवर सांगली-कोल्हापूर परिसरात आलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुंबईसह वाघेरी असलेल्या असंख्य ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
आमची सामाजिक बांधिलकी असून त्यासाठीची मदत आम्ही पूरग्रस्तांना देत असल्याची माहिती या मंडळाचे पदाधिकारी सुरेश ठुकरुल यांनी दिली. आतापर्यंत वाघेरी ग्रामस्थांकडून तब्बल साडेसातशे एक किलो अन्न धान्य, कपडे, शालेय वस्तू आदींचे वाटप केले जात आहे. यासाठी वाघेरी गावाचे सरपंच संतोष राणे, पोलीस पाटील अनंत रावराणे आणि शिक्षक राजेश राणे यांनी यासाठी पुढाकार घेत ही मदत पूरग्रस्तांना पोहोचविण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली असल्याची माहितीही सुरेश ठुकरुल यांनी दिली. मंडळाकडून यापुढेही पूरग्रस्तांना मदत केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.