मुंबई - शहरातील ६ लोकसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक ६० टक्के मतदान एकट्या उत्तर मुंबई मतदारसंघात झालेले आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत ५३ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत ७ टक्क्यांनी मतदानाचा टक्का वाढलेला आहे.
मुंबईतील ६ मतदारसंघापैकी उत्तर मुंबईत सर्वाधिक मतदान - मुंबई
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लाख ४७ हजार २०८ मतदार आहेत. त्यापैकी ९ लाख ८८ हजार २५२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदानाचा हक्क बजावताना मतदार
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लाख ४७ हजार २०८ मतदार आहेत. त्यापैकी ९ लाख ८८ हजार २५२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ५ लाख ४२ हजार २२७ पुरुष मतदार आणि ४ लाख ४५ हजार ८५८ महिला मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
विधानसभा मतदारसंघानिहाय मतदानाची टक्केवारी
- बोरीवली विधानसभा मतदारसंघ - या मतदारसंघात एकूण ६६.१९ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये २ लाख ९१ हजार ७३८ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ९३ हजार ९८ मतदारांनी मतदान केले.
- दहिसर विधानसभा मतदारसंघ - या मतदारसंघात ६२.३९ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये १ लाख ५६ हजार ३७४ नागरिकांनी मतदान केले.
- मागो ठाणे विधानसभा मतदारसंघ - यामध्ये ५७.७२ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात १ लाख ५४ हजार ८४२ नागरिकांनी मतदान केले.
- कांदिवली विधानसभा मतदारसंघ - या मतदारसंघात ५५.७१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये १ लाख ४७ हजार ७४४ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
- चारकोप विधानसभा मतदारसंघ - यामध्ये ६०.८० टक्के मतदान झाले आहे. एकूण १ लाख ७१ हजार ९११ मतदारांनी मतदान केले.
- मालाड विधानसभा मतदारसंघ - या मतदारसंघात ५६.९२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये १ लाख ६४ हजार २८३ मतदारांनी मतदान केले आहे.