महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Voter id and Aadhaar link : मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याकडे मतदारांनी फिरवली पाठ - Urban Voters Ignore Campaign

मतदार यादीतील द्विरुक्ती, मतदार यादी मधील गडबड आणि घोटाळे रोखण्यासाठी मतदान ओळखपत्र आधारशी लिंक ( Voter ID link with Aadhaar) करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. मात्र मतदारांनी निवडणूक आयोगाच्या आवाहनाकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः शहरी भागातील नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे.

Voters id
मतदान कार्ड

By

Published : Nov 4, 2022, 5:13 PM IST

मुंबई :मतदार यादीमधील घोळ संपावेत आणि योग्य मतदार याद्या प्रसिद्ध करता याव्यात यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व मतदारांची ओळखपत्र आधारशी जोडण्याचा (Voter ID link with Aadhaar ) निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व मतदारांना ओळखपत्राशी आपले आधार जोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र मतदारांनी या आवाहनाकडे पाठ फिरवल्याचे ( Urban Voters Ignore Campaign ) दिसत आहे. मुख्य म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील मतदारांनी या आवाहनाकडे अधिक दुर्लक्ष केले आहे.

कोणत्या शहरांमध्ये काय परिस्थिती? :राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरासह उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आधारशी मतदान ओळखपत्र जोडण्याचे काम अत्यंत संतगतीने सुरू आहे. एक ऑगस्ट 2022 पासून महाराष्ट्र अभियानाला सुरुवात झाली आहे. मात्र आतापर्यंत नागपूरमध्ये 27. 26 टक्के मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. मुंबईत केवळ 13 टक्के नागरिकांनी आधारशी मतदार कार्ड जोडले आहे. ठाण्यात हे प्रमाण सर्वात कमी असून केवळ साडेसात टक्के नागरिकांनी आधारशी आपले मतदान कार्ड जोडले आहे.

ग्रामीण भागातील स्थिती? :नागपुरातील चाळीस लाख 76 हजार 919 मतदारांपैकी केवळ अकरा लाख 11 हजार 200 मतदारांनी आपले मतदान कार्ड जोडले आहे. तर 29 लाख 65 हजार 719 मतदारांचे अर्ज सहा बी हा मतदान कार्डशी जोडण्याचे काम बाकी असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. ठाणे जिल्हा सगळ्यात पिछाडीवर असून केवळ साडेसात टक्के लोकांनी सहभाग नोंदवला आहे हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक मतदारांनी आधारशी लिंक केले असून 67.71% इतके प्रमाण आहे. पुण्यातील 78 लाख 76 हजार 950 मतदाना मतदारांनी पैकी फक्त सात लाख 77 हजार 906 मतदारांनी आधारशी लिंक केले आहे मुंबईतील 95 लाख 96 हजार 226 मतदारांपैकी बारा लाख 75 हजार 88 मतदारांनी प्रतिसाद दिला आहे तर औरंगाबाद जिल्ह्यातील 29 लाख 2119 मतदारांपैकी तेरा लाख 81521 म्हणजे 47 टक्के मतदारांनी आधारशी मतदान कार्ड जोडले आहे. एप्रिल 2023 पर्यंत हे कार्य पूर्ण होणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अपेक्षित आहे.

9 नोव्हेंबरपासून अभियान : आधारशी मतदान कार्ड जोडण्याचे महाराष्ट्रातील प्रमाण हे 41 टक्क्यांच्या आसपास आहे. हे प्रमाण वाढायला हवे आणि शहरी मतदारांनी यामध्ये अधिक सहभाग नोंदवायला हवा यासाठी येत्या नऊ नोव्हेंबर पासून आपण मतदारांना जागृत करण्याचे आणखी एक अभियान ( Campaign to link voter card with Aadhaar ) सुरू करणार असल्याची माहिती श्रीकांत देशपांडे यांनी दिली. त्यानंतर या प्रक्रियेला अधिक वेग येईल आणि जास्तीत जास्त मतदारांचे कार्ड जोडले जाईल असेही देशपांडे म्हणाले. मतदारांनी आपले कार्ड जोडण्यासाठी आपल्या विभागातील स्थानिक निवडणूक कार्यालयात संपर्क साधायला हवा. बूथ लेवल अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपली कागदपत्रे जोडायला हवीत यासाठी केवळ आपल्याला आपला आधार क्रमांक आणि मतदान ओळखपत्र क्रमांक सादर करणे अपेक्षित आहे. ही माहिती बूत लेवल अधिकारी तपासून ताबडतोब आपले आधार कार्ड आपल्या मतदार ओळखपत्राशी जोडून देईल असेही देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details