महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nawab Malik arrest by ED : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक; छाप्यापासून अटकेपर्यंतचा 'असा' राहिला घटनाक्रम...

नवाब मलिक यांच्या अटकेची बातमी कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमा झाले. नवाब मलिक यांच्या वेळ आकसाने कारवाई होत असून त्यांना नाव अडकवले जात असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

By

Published : Feb 23, 2022, 5:25 PM IST

Updated : Feb 23, 2022, 5:31 PM IST

Nawab Malik
नवाब मलिक

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने आज पहाटे ताब्यात घेतले. ( Nawab Malik arrest by ED ) त्यांच्या कुर्ला येथील राहत्या घरात सकाळी पहाटे साडेचार वाजता ईडीचे अधिकारी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. ( Nawab Malik ED Investigation ) सात तासांच्या चौकशीनंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयातही हजर करण्यात आले आहे.

ईडी कार्यालयबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी -

नवाब मलिक यांच्या अटकेची बातमी कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमा झाले. नवाब मलिक यांच्या वेळ आकसाने कारवाई होत असून त्यांना नाव अडकवले जात असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

लढेंगे जितेंगे - मलिक

सात तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर मलिक यांना जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना मलिक यांनी हात उंचावून कार्यकर्त्यांना दिलासा दिला. त्यानंतर गाडीत बसताना त्यांनी लढेंगे जितेंगे अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली. दरम्यान आज सकाळीच नवाब मलिक यांनी युनिटच्या माध्यमातून आपण झुकणार नाही असे संकेत दिले होते.

अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत नवाब मलिक यांची चौकशी -

मुंबईत काही दिवसांपूर्वी एन आय ए आणि ईडीकडून संयुक्त छापे टाकण्यात आले होते. याचा पण दरम्यान कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर तिच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले होते. तसेच या प्रकरणी दारूचा भाऊ इक्‍बाल कासकर यालाही ईडीकडून नुकतीच अटक केली आहे. या चौकशीत नवाब मलिक यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

काय आहेत नवाब मलिक यांच्यावरील आरोप -

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोट खटल्यातील आरोपी करून मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुर्ला येथील ही तीन एकर मोक्याची जागा मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांनी खरेदी केली आहे. ही जमीन ३० लाख रुपयांत खरेदी केली असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात वीस लाख रुपये दिले गेले आहेत. ही जमिन मलिक यांच्या सोलिडस कंपनीनं २००५ मध्ये शहावली आणि सलीम पटेल यांच्यासोबत व्यवहार करून खरेदी केल्याचे आरोप आहेत. २००५ मध्ये कुर्ल्यातील जमिनीचा भाव २०५३ रुपये चौरस फूट असताना मलिक यांनी मात्र पंचवीस रुपये चौरस फूट दराने खरेदी केली आहे. या जमिनीच्या वटमुखत्यारपत्र सलीम पटेल यांच्याकडे असले तरी विक्री सरदार शहावलीच्या नावाने करण्यात आली आहे. तर जमीन खरेदीच्या कागदपत्र वरील सह्या मात्र फराज मलिक यांच्या असल्याचा आरोप आहे.

नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ठपका ठेवत त्यांना अटक केले असल्याची माहिती ईडीने त्यांना बजावलेल्या रिमांड नोट मधून समोर आली आहे.

Last Updated : Feb 23, 2022, 5:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details