रेल्वेचे प्रवाशी विठू माऊलीच्या दिंडी सोहळ्यात मुंबई : मुंबई लोकल चर्चगेट स्थानकात गुरुवारी पांडुरंगाच्या भक्तीचा मेळा फुललेला पाहायला मिळाला. चर्चगेट स्थानकात मुंबईची लाईफ लाइन लोकलमध्ये भक्तीचा सागर लोटलेला दिसला. लोकल चाकरमान्यांच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे. मुंबईकर देखील घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावत असतात.
पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन : लोकलची गर्दी म्हटले की, एकमेकांना लागणारा धक्का त्यात निर्माण होणारे वाद. मात्र यातून देखील आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे, अशा प्रकारची कसरत मुंबईकरांना दररोज करावी लागते. मात्र गुरुवारी स्थानकातील वातावरण वेगळे दिसले. मुंबईतील चर्चगेट स्टेशनवर पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान करत अनेक मुंबईकर आषाढी एकादशीला भजनामध्ये तल्लीन झाले. मुंबई उपनगरातून आपल्या घरापासून ते चर्चगेट स्टेशनपर्यंत अनेकांनी दिंडी घेऊन आले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि मुखातून विठू माऊलीचे भजन कीर्तन करत आहे. अशा प्रकारचा भक्तांचा मेळा बघण्यासाठी चाकरमान्यांनी काही काळ आपली पावले चर्चगेट स्थानकात थांबली होती. आषाढी एकादशीनिमित्त चर्चगेट स्थानकावर विठुरायाच्या दिंडी सोहळ्यात चाकरमानी दंग झाले. त्यांच्याशिवाय रेल्वे पोलिसही भक्तीत तल्लीन होत पांडुरंगाच्या भजनांवर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले
कानडा पंढरीचा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठु माझा लेकुरवाळा या भजनांनी चर्चगेट परिसर दणाणला होता. वारकरी संप्रदायाची जोपासना गेल्या 38 वर्ष आम्ही दिंडीच्या माध्यमातून चर्चगेट स्थानकात दर आषाढी एकादशीला आम्ही येत असतो. यंदाचा हे 39 वी वर्ष आहे. - वसंत श्रीधर प्रभू
गेल्या 38 वर्षांपासून बोरवली ते चर्चगेट असा प्रवास आम्ही करत असतो. यामध्ये अनेक विद्यार्थी देखील आमच्यासोबत प्रवास करत असतात. प्रवास करत असताना कशाप्रकारे स्वतःची काळजी घ्यायची सोबतच आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी, अशा प्रकारचा मार्गदर्शन आमच्या मंडळाकडून केले जाते. तसेच कोरोना काळात मध्ये देखील उपक्रम राबविण्यात आले. वारकरी संप्रदायाची जोपासना कशी केली जाते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचा सोहळा पाहून समजून येईल. - संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे वसंत श्रीधर प्रभू
हेही वाचा -
- Ashadhi Ekadashi : आधी नंदापुरी मग पंढरपुरी; आषाढीसाठी कोल्हापूरातील प्रतिपंढरपूर नंदवाळ सज्ज
- Ashadhi wari 2023: श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचा सोहळा रविवारी साताऱ्यात; तब्बल पाच दिवस असणार मुक्काम
- Ashadhi Ekadashi 2023 : विठुरायाच्या भजनात दंग झालेली 'ती' चिमुकली शिर्डीची; पाहा व्हिडिओ