मुंबई - केंद्रात आणि राज्यांत हिंदुत्ववादी विचारांचे सरकार यावे, अशी विश्व हिंदू परिषदेची कायमच इच्छा असते. त्यातच राज्यात आणि केंद्रात गेल्या वर्षात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले. सर्व हिंदूंनी शक्तीने एकत्र आले पाहिजे, यासाठी राजकारण न करता हिंदुत्ववादी विचारांचे सरकार बनविण्यासाठी आम्ही विश्व हिंदू परिषदेच्यावतीने निवडणुकीच्या आधी सर्वांना आवाहन करतो. परंतु राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर निवडणुका लढलेल्या पक्षांमध्ये सत्तास्थापनेवरून वाद सुरू आहे. शिवसेनेने काही मागण्यांसाठी आपण भाजप सोबत सरकार स्थापन करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने भाजपने शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढले आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारावर लढलेल्या शिवसेनेने कुठे तरी आता याची चिंता करावी, असा टोला विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी दिला.
शिवसेनेला चिंतन करण्याची गरज - विश्व हिंदू परिषद - vishwa hindu parishad reaction shivsena
राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर निवडणुका लढलेल्या पक्षांमध्ये सत्तास्थापनेवरून वाद सुरू आहे. शिवसेनेने काही मागण्यांसाठी आपण भाजप सोबत सरकार स्थापन करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने भाजपने शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढले आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारावर लढलेल्या शिवसेनेने कुठे तरी आता याची चिंता करावी, असा टोला विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी दिला.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीसांसह अनेक भाजप नेते शिवतीर्थावर; बाळासाहेबांना केले अभिवादन
देशात हिंदूत्ववादी विचारांचे सरकार आले पाहिजे आणि हिंदूच्या समस्या सोडवल्या पाहिजे, यासाठी हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार देशात स्थापन व्हावे, अशी समस्त हिंदू जणांची भावना असते. त्यामुळेच हिंदू मतदान करतात. राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागितली आणि विजयी झाले. युतीला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चांगले बहुमत देखील मिळाले. परंतु दोन्ही पक्षातील आपसातील जागा वाटपाच्या वादामुळे सरकार बनू शकत नाही. त्यामुळे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. यावर परांडे म्हणाले की, शिवसेना राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन करणार नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा विचार करत शिवसेनेने याबाबत चिंता करावी. आपण यावर काही बोलू इच्छित नाही असा टोलाही परांडे यांनी लगावला.