मुंबई- सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना आपल्या प्रथा परंपरा व धार्मिक संस्कृती जपावी यासाठी गणेश मंडळ वेगवेगळे दरवर्षी देखावे करतात. यातुन समाजप्रबोधन करणे हाच गणेश मंडळाचा एक चांगला उद्देश असतो. गोवंडीच्या छत्रपती संभाजी क्रीडा मंडळाने यावेळी असाच देखावा यावर्षी कंबोडियातील विष्णूचे मंदिर साकारले आहे. यात गणरायाची सुंदर मूर्ती विराजमान झाली आहे. विष्णूचे मंदिर आणि गणरायाला पाहण्यासाठी गोवंडीत गणेश भक्त मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
गोवंडीत कंबोडिया देशातील प्राचीन विष्णूच्या मंदिराचा देखाव्याचा आढावा हेही वाचा-मानखुर्दमध्ये घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या
गोवंडी येथील छत्रपती संभाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 50 वे वर्ष आहे. मंडळाने यावर्षी कंबोडिया देशातील विष्णूचे मंदिर बनवले आहे. हिंदू भारतीय संस्कृती, धर्म, परंपरा व हिंदू देव-देवता यांचे देशाबाहेरील मंदिर कशा प्रकारे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. या भव्य मंदिराची प्रत्येक भारतीयांना ओळख व्हावी, यासाठी भगवान विष्णूचे परदेशातील मंदिर गणेशोत्सव निमित्त साकार करण्यात आले. या मंदिरात वेगवेगळ्या प्रकारचे भिंतीच्या चौबाजूने सुंदर असे कलाकृती रेखाटली आहे. मंदिराच्या उत्तर दिशेला विष्णूची मूर्ती आहे. तर दक्षिण बाजूला गणेशाची मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर गणपतीचे दर्शन झाल्यानंतर विष्णूचे दर्शन होते.
हेही वाचा -मुंबईत मोदींच्या हस्ते तीन मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन; औरंगाबादलाही जाणार
कंबोडिया देशात इसवीसनपूर्व बाराव्या शतकामध्ये सम्राट सूर्यवर्मन द्वितीय या खमेर राजवटीतील शासन कर्त्याने 402 एकर अशा विस्तीर्ण परिसरात विष्णूचे मंदिर निर्माण केले. जगातील सर्वात मोठे मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या यादीमध्ये या वास्तूला अग्रणी स्थान बहाल करण्यात आले आहे. जगभरातील पर्यटक या ठिकाणी वास्तुशास्त्राचा अमोल ठेवा पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वर्षभर भेट देत असतात.