मुंबई -अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू कशामुळे झाला? हे जाणून घेण्यासाठी तसेच त्याच्यावर काही विषप्रयोग झाला होता का? हे पाहण्यासाठी त्याचा व्हिसेरा अहवाल पुन्हा एकदा तपासला जाणार आहे.सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एनसीबी, सीबीआय आणि ईडी हे विभाग करत आहेत. यातून तपासाचा वेग वाढावा यासाठी एनसीबी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम तयार करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सुशांतसिंहच्या मृत्यूचे गूढ आता वाढू लागले आहे. एकीकडे रियाची दोन दिवस सातत्याने चौकशी होत आहे. दुसरीकडे सीबीआयही आपल्या तपासाचा वेग वाढवत संशय असलेल्या सर्वांची चौकशी केली जात आहे. आता सीबीआयने सुशांतची मैत्रीण आणि एका पीआर कंपनीची मालक असलेल्या रोहिणी अय्यरला चौकशीसाठी बोलावले होते.