मुंबई -लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध करण्यासाठी काही औषधे ऑनलाईन मार्केटमध्ये सर्रास विकली जात आहे. यातील 'रक्त पावडर' असलेल्या कॅप्सूलचा वापर करून कौमार्य चाचणीत पास होण्याचा किळसवाणा प्रकार सुरू आहे.
कौमार्य चाचणीसाठी 'व्हर्जिनिटी कॅप्सूल’; ऑनलाईन मार्केटमध्ये सर्रास विक्री - व्हर्जिनिटी कॅप्सूल न्यूज
लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध करण्यासाठी काही औषधे ऑनलाईन मार्केटमध्ये सर्रास विकली जात आहेत. यातील 'रक्त पावडर' असलेल्या कॅप्सूलचा वापर करून कोमार्य चाचणीत पास होण्याचा किळसवाणा प्रकार सुरू आहे.
व्हर्जिनिटी कॅप्सूल
22व्या शतकाकडे देशाची वाटचाल होत असताना अशा प्रकारच्या गोळ्यांचा वापर होणे हे खेदजनक आहे. या औषधांचा कसा वापर होतो? या कॅप्सूल मेडिकल दुकानात विकल्या जातात का? डॉक्टरांना याबाबत काय वाटते? हे जाणून घेण्यासाठी ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी घेतलेला हा आढावा.