मुंबई :सावरकर मुद्द्यावरून सध्या राजकारण तापले दिसत आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेना, भाजप खूप आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या एका सभेदरम्यान सर्व चोरांची नावे मोदी असतात, असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई केल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आपली खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्याकडून आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये माझे नाव राहुल गांधी आहे, मी सावरकर नाही. मी माफी मागणार नाही. असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावरून राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांच्यावरती राजकीय पक्षांकडून टीका केली जात आहे.
सावरकरांकडून निषेध :स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांनीही राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सावरकर यांनी माफी मागितली असल्याचे पुरावे दाखवा, असे आवाहन त्यांनी दिले आहे. त्याचबरोबर राहुल गांधी जे काही बोलत आहेत, ती बालिशपणाची वक्तव्ये आहेत. देशभक्तांच्या नावाचा वापर करून राजकारण करणे निषेधार्ह असल्याचे सावरकर यांनी म्हटले आहे. समाज माध्यमांवर राहुल गांधीचा निषेध केला जात आहे.