मुंबई - जेजे समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जीटी रुग्णालय येथे कोरोना ग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे. ही माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज(शुक्रवार) मुंबई येथे दिली.
जे.जे. कडून कोरोनाग्रस्तांसाठी स्वतंत्र विभाग... नोडल ऑफिसर म्हणून विनिता सिंघल यांची नेमणूक - corona virus update
जेजे समूह रुग्णालयातील कोरोना ग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे.
विनिता सिंघल
जेजे समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात 300 खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि 60 खाटांचा आयसीयू विभाग असेल. त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात 250 खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि 50 खाटांच्या आयसीयू विभागाची व्यवस्था करण्यात येत आहे.
ही दोन्ही रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत. मुंबईप्रमाणे पुणे येथेही स्वतंत्र 700 खाटांच्या कोरोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी 100 खाटा आयसीयूसाठी असतील, असेही देशमुख म्हणाले.