मुंबई -मराठा समाजाला आरक्षण देऊन नोकरीमध्ये आरक्षण मिळावे याकरिता मागील सरकारने जाहिराती देऊन भरती करण्यात आली होती. परंतू 3500 मुले त्यापासून वंचित राहिल्यामुळे हे विद्यार्थी आजाद मैदान येथे मागील 47 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या उमेदवारांना कधी न्याय देणार याबाबत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी लक्षवेधी सुचना केली होती.
मराठा उमेदवारांना न्याय कधी मिळणार - विनायक मेटे - maratha community
आझाद मैदानात मराठा समाजातील विद्यार्थी गेल्या 47 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या उमेदवारांना न्याय कधी मिळणार असा सवाल शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी विधान परिषदेत विचारला आहे.
हेही वाचा -विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या मान्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला उत्तर देताना सभागृहाला असे संगितले की, हा प्रश्न न्यायालयात याचिका दाखल असल्याने प्रलंबित असुन सध्या कोणतीही घोषणा करता येणार नाही. मात्र, याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेवून त्या 3500 हजार विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत घेऊ, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. तत्पूर्वी सर्व पक्षांनी आझाद मैदान येथे जाऊन त्या विद्यार्थ्यांचे उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार आम्ही उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.