मुंबईWinter Session 2023 :आज विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची विधिमंडळात बैठक पार पडली. या बैठकीला तीनही पक्षांचे नेते, मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित होते. नागपूर येथील अधिवेशनाचा कालावधी कमी आहे. सरकारनं कालावधी वाढवून दिला पाहिजे. बैठकीत राज्यातील जनतेला भेडसावीत असलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. सर्व विषय धरुन पुढं कसे न्यायचे यावर चर्चा सविस्तर झाली. सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी हे प्रश्न गंभीर आहेत. त्याचबरोबर भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. सगळ्या प्रश्नना घेऊन आम्ही सरकारला जाब विचारणार असल्याचं विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले. 6 तारखेला पुढील बैठक होणार आहे. महाराष्ट्राला ड्रग्जचा विळखा पडला आहे. तरुण पिढी वाया जात आहे. सरकार आज फक्त आरक्षण आणि एकमेकांवर बोलत असून मूलभूत विषयांना बगल देण्याचं काम सरकारकडून सुरु आहे. तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान यार चारही राज्यात 100 टक्के काँग्रेस विजयी होईल, असा आम्हांला विश्वास असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता: नागपूर इथं 7 तारखेला अधिवेशन सुरुवात होत आहे. राज्यपुढं जनतेचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना सोडवण्याच्या उद्देशानं सरकार मात्र समोरं जात नसल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता आहे, शासनाकडून काहीच होत नाही. अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आहे. बेरोजगारी वाढलीय, प्रगती थांबली, सरकार काहीच करत नाही. देशात इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू असं विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. आत आता महाविकास आघाडीत अजित पवार नाहीत. विजयी होण्याची क्षमता महाविकास आघाडीत आहे. पाचही राज्याच्या निवडणूक निकालात काँग्रेसचं विजयी होईल, असा ठाम विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.