मुंबई - ईटीव्ही भारतचे पत्रकार विजय गायकवाड यांना अरविंदबाबू देशमुख उत्कृष्ट कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी केलेल्या कृषी क्षेत्रातील पत्रकारिता, शोध पत्रकारितेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याची घोषणा अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मुंबईत मंत्रालयात दिली. या पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्या हस्ते शुक्रवार ८ फेब्रुवारीला वनामती सभागृह, धरमपेठ, नागपूर येथे होणार आहे.
'ईटीव्ही भारत'चे पत्रकार विजय गायकवाड यांना उत्कृष्ट कृषी पत्रकारिता पुरस्कार - nagpur
ईटीव्ही भारतचे पत्रकार विजय गायकवाड यांना अरविंदबाबू देशमुख उत्कृष्ट कृषी पत्रकारिता जाहीर झाला आहे. त्यांनी केलेल्या कृषी क्षेत्रातील पत्रकारिता, शोध पत्रकारितेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
देखमुख प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांना जाहीर झाला आहे. विशेष पुरस्कार जाहीर झालेल्या पत्रकारांमध्ये विजय बावीस्कर (मुद्रित माध्यमातील उत्कृष्ट कामगिरी), डॉ. उदय निरगुडकर (इलेक्ट्रॉनिक माध्यमातील उत्कृष्ट कामगिरी), सुनील चावके (राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट मराठी पत्रकारिता), निशांत सरवणकर (उत्कृष्ट शोध पत्रकारिता), रामराव जगताप (ई-मीडियातील उत्कृष्ट कामगिरी), न. मा. जोशी (उत्कृष्ट सामाजिक पत्रकारिता), दीपा कदम (उत्कृष्ट महिला पत्रकारिता) यांचा समावेश आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात राहून समाजात जाणीवजागृती निर्माण करणाऱ्या तसेच समाजातील वंचितांचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी सक्रीय योगदान करणाऱ्या पत्रकारांना मागील दशकापेक्षा अधिक काळापासून अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविले जाते. महाराष्ट्र व राष्ट्रीय स्तरावरील मराठी पत्रकारितेतील मान्यवरांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी हे प्रतिष्ठान पुरस्कार प्रदान करीत असते, अशी माहिती यावेळी डॉ. देशमुख यांनी दिली.