मुंबई- शिवेसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे पूत्र विहंग सरनाईक यांना ईडीने समन्स बजावले होते. ते आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. त्यांना ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी मंगळवारी पुन्हा एकदा समन्स बजावले होते.
शिवसेना आमदार पूत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल - ईडी चौकशी विहांग सरनाईक
विहंग ग्रुप ऑफ कंपनीज आणि टॉप ग्रुपच्या कार्यालयांवर, तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर विहंग सरनाईक यांना पुन्हा ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते.
शिवसेना आमदार पूत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून तपास केला जात आहे. टॉप्स ग्रुपच्या दोन अधिकाऱ्यांना ईडीने अटक केलेली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची सुद्धा ईडीकडून चौकशी करण्यात आली. प्रताप सरनाईक यांची मुले पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना पुन्हा ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यानंतर आज विहंग चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले आहेत.