मुंबई- मागील काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याला मोकाट बैलाने दिलेल्या धडकेत तो गंभीर जखमी झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आयआयटी मुंबईच्या एका लेक्चर हॉलमध्येच बैल मोकाटपणे फिरतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा आयआयटी आणि परिसरातील मोकाट जनावरांचा विषय गंभीर बनला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आयआयटी मुंबईच्या लेक्चर हॉलमध्येच मोकाट बैलाचा वावर, पाहा व्हिडिओ... - मोकाट बैलाचा वावर
आयआयटी मुंबईच्या एका लेक्चर हॉलमध्ये एक बैल मोकाटपणे फिरत असून त्यामुळे लेक्चरला बसलेले विद्यार्थी घाबरून दुसरीकडे पळतानाचे चित्र या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. लेक्चर सुरू असताना विद्यार्थी बसलेले आहेत आणि ऐनवेळी वर्गात या मोकाट बैलाचा प्रवेश होतो आणि सर्व विद्यार्थी घाबरून त्याला जाण्यासाठी जागा देतात.
आयआयटी मुंबईच्या एका लेक्चर हॉलमध्ये एक बैल मोकाटपणे फिरत असून त्यामुळे लेक्चरला बसलेले विद्यार्थी घाबरून दुसरीकडे पळतानाचे चित्र या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. लेक्चर सुरू असताना विद्यार्थी बसलेले आहेत आणि ऐनवेळी वर्गात या मोकाट बैलाचा प्रवेश होतो आणि सर्व विद्यार्थी घाबरून त्याला जाण्यासाठी जागा देतात. एक विद्यार्थी उठवून त्याला पाठीमागून हाकलण्याचा प्रयत्न करतो, असे या व्हिडिओत दिसत आहे.
यासंदर्भात आयआयटी मुंबईच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आतापर्यंत या संदर्भात कोणताही खुलासा केला नाही. मात्र, हा व्हिडिओ आयआयटी मुंबईमधीलच असल्याचे सांगण्यात येत आहे.