मुंबई- डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या जामीन याचिकेवरील सुनावणी येत्या 30 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्याबरोबरच याप्रकरणी जामीन अर्जावर होणाऱ्या सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : जामीन अर्जावरील सुनावणीचे होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग - नायर रुग्णालय
याप्रकरणी जामीन अर्जावर होणाऱ्या सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
पायल तडवी यांच्या कुटुंबीयांच्यावतीने युक्तिवाद करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून अट्रॉसिटीच्या कायद्यानुसार जामीन अर्जावर होणाऱ्या सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे, हा नियम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
दरम्यान, नायर रुग्णालयातील डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी डॉक्टर हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी 2 हजार पानांचे आरोपपत्र मंगळवारी न्यायालयात दाखल केले होते. पायल तडवी प्रकरणात रॅगिंग व अॅट्रॉसिटीचा गुन्हा आग्रीपाडा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. त्यानंतर याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. तपास पूर्ण करून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात नायर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे जबाब , पायल तडवी हिच्या कुटुंबियांचे जबाब यांसह इतर पुरावे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहेत.