मुंबई: गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाला बहुमत मिळाले आहे. मात्र हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नसून ईव्हीएमचे आहे. मोदी यांनी हिमाचल प्रदेश येथेही प्रचार केला होता. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला आहे. मात्र हा मोदी यांचा पराभव झाल्याचे दाखवले जात नाही आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी दिली आहे.(Bhai Jagtap on gujrat election)
Bhai Jagtap : गुजरातमधील विजय हा ईव्हीएमचा विजय - भाई जगताप - गुजरातमधील विजय हा ईव्हीएमचा विजय
मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाई जगताप (Bhai Jagtap) बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "भाजपाचे मुंबईतील माजी खासदार किरीट सोमय्या पाठीवर ईव्हीएम मशीन घेवून यात घोटाळा असल्याचे सांगत होते. मात्र आता ते गप्प झाले आहेत. यामुळे गुजरात मधील हा विजय ईव्हीएमचा आहे". (Victory in Gujarat is victory of EVM) (Bhai Jagtap on gujrat election)
मोदींचा करिश्मा, तर हिमाचलमध्ये पराभव कसा? : मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाई जगताप बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "भाजपाचे मुंबईतील माजी खासदार किरीट सोमय्या पाठीवर ईव्हीएम मशीन घेवून यात घोटाळा असल्याचे सांगत होते. मात्र आता ते गप्प झाले आहेत. यामुळे गुजरात मधील हा विजय ईव्हीएमचा आहे". मोदी यांनी हिमाचल प्रदेशमध्ये प्रचार केला होता. त्यांचा जर आजही करिश्मा असता तर मग त्या ठिकाणी मोदी आणि भाजपाचा पराभव कसा झाला, असा प्रश्न जगताप यांनी यावेळी उपस्थित केला.
मोर्चात सहभागी होणार :राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपाचे बेकायदेशीर सरकार सत्तेत आहे. त्यांच्या विरोधात महाविकास विकास आघाडी येत्या १७ तारखेला मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात मुंबई काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार आहे. राज्यघटनेने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. संजय निरुपम यांचे आंदोलन असो किंवा महाविकास आघाडी सरकारच्या मोर्चा असो त्यात सहभागी होणार असल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले.