मुंबई Ram Temple Inauguration :अयोध्या येथे येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच श्रीप्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातून मान्यवर आणि साधूसंत उपस्थित राहणार आहेत; मात्र या कार्यक्रमाला इतर नागरिकांनीही उपस्थित राहावं आणि देशभरात एक वातावरण निर्माण व्हावं यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं संकल्प करण्यात येणार आहे. (VHP Secretary Mohan Salekar)
काय आहे विश्व हिंदू परिषदेचा संकल्प -विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं येत्या 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान राज्यातल्या सुमारे 75 लाख घरांपर्यंत पोहोचण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. तसंच कोकण प्रांतातील 40 लाख घरांपर्यंत पोहोचणार आहोत, अशी माहिती कोकण प्रांत विश्व हिंदू परिषदेचे सचिव मोहन सालेकर यांनी दिली आहे. देशातील प्रत्येक रामभक्ताला या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची निश्चितच इच्छा असणार; मात्र प्रत्येक जण या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे या निमित्तानं राज्यातील 75 लाख घरांपर्यंत या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका आणि अयोध्या राम मंदिरात मंत्रित केलेल्या अक्षता या कुटुंबांपर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोहोचवल्या जाणार आहेत. त्यासाठी 40 हजार कार्यकर्ते 1 ते 15 जानेवारी दरम्यान या कुटुंबांशी संपर्क साधतील, असंही सालेकर यांनी सांगितलं.