महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MP Priyanka Chaturvedi : निर्भया पथकाच्या निधीतून बंडखोर आमदारांची मौजमजा - खासदार प्रियंका चतुर्वेदी - खासदार प्रियंका चतुर्वेदी

दिल्लीत घडलेल्या निर्भया हत्याकांड नंतर संपूर्ण देशात संतापाची लाट होती. यावेळी केंद्र सरकारने तातडीने निर्भया पथक प्रत्येक राज्यामध्ये तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता निर्भया निधीतून घेण्यात आलेल्या वाहनांचा वापर (vehicles taken from Nirbhaya Fund) बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी होत (used for security of rebel MLAs) आहे. असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (MP Priyanka Chaturvedi made allegation) यांनी केला आहे.

MP Priyanka Chaturvedi
खासदार प्रियंका चतुर्वेदी

By

Published : Dec 11, 2022, 6:51 PM IST

Updated : Dec 11, 2022, 9:33 PM IST

मुंबई :केंद्र सरकारकडून आलेल्या निर्भया निधीतून घेण्यात आलेल्या वाहनांचा वापर (vehicles taken from Nirbhaya Fund) बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी (used for security of rebel MLAs) होत असून; यावर केंद्रातील महिला व बालविकास मंत्र्यांनी तातडीने लक्ष घातले पाहिजे. राज्यातील सत्ताधारी पक्ष निर्भया पथकाचा निधी आणि त्यासाठी वापरण्यात येणारी वाहनं हे आपल्या मौजमजेसाठी वापरत असल्याचा आरोप, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केला (MP Priyanka Chaturvedi made allegation) आहे. शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला आहे.

वाहन बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी? : दिल्लीत घडलेल्या निर्भया हत्याकांड नंतर संपूर्ण देशात संतापाची लाट होती. यावेळी केंद्र सरकारने तातडीने निर्भया पथक प्रत्येक राज्यामध्ये तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी केंद्रातून निधी देखील पुरवला जातो. तो निधी राज्य सरकारला मिळावा यासाठी तात्कालीन उद्धव ठाकरे सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर निर्भया निधी राज्यात आणला गेला. मात्र आता त्या निर्भयानिधीतून निर्भया पथक चालवण्यासाठी घेण्यात आलेली वाहन ही बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येत आहेत. सत्ताधारी पक्ष केवळ सत्तेचा उपभोग घेत आहे. सामान्य नागरिकांची त्यांना काहीही घेणं देणं नाही, असा टोला प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून लगावला आहे.


महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारला वेळ नाही :राज्यामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. गंभीर गुन्हे महिलांच्या बाबतीत होताना पाहायला मिळतात. मात्र अशी परिस्थिती राज्यात असताना राज्यातले मंत्री आमदार कधी इतर राज्यांमध्ये प्रचारासाठी जात आहेत. गुहाटी ला जात आहेत, तर कधी दिल्ली दरबारी जात आहेत. आज संपूर्ण मंत्रिमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी नागपूरला आहे. कार्यक्रमांमध्ये राज्य सरकार व्यस्त आहे. या राज्य सरकारला महिलांच्या प्रश्नांकडे पाहायला वेळ नाही. महिलांवर अभद्र बोलणारे नेते मंत्रिमंडळात आहेत, असाही टोला प्रियंका चतुर्वेदी यांनी लगावला आहे. तसेच या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे :निर्भया पथकातील वाहने यांचा होत असलेला गैरवापर यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालणं गरजेचं आहे. तसेच केंद्राकडून निर्भया पथकासाठी पाठवण्यात आलेला निधीचा कसा प्रकारे गैरवापर होतो आहे, याकडे केंद्र सरकारने लक्ष घालावं, अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी या पत्रकार परिषदेतून केली आहे. मात्र, यासोबतच संसदेचे सुर आलेल्या अधिवेशनात आपण हा मुद्दा उपस्थित करणार असून; महिला व बालविकास मंत्री यांची देखील भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निर्भया फंडातून खरेदी केलेली वाहने आमदारांच्या संरक्षणासाठी -निर्भया फंडातून मुंबई पोलिसांनी खरेदी केलेली वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या संरक्षणासाठी वापरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. मुंबईत महिलांची सुरक्षा करण्यासाठी निर्भया फंडातून 30 कोटी रुपये मंजुर करण्यात आले होते. त्यातून मुंबई पोलिसांनी 220 बोलेरो, 35 एर्टीगा, 313 पल्सर, 200 अ‍ॅक्टीव्हा खरेदी केल्या होत्या. त्यानंतर या गाड्यांच्या तुकडीचा समावेश मुंबई पोलिसांच्या ताफ्यात करण्यात आला होता. मात्र शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी 47 बोलेरो गाड्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सतरा गाड्या परत करण्यात आल्या असून सध्या आमदारांच्या सुरक्षेच्या ताब्यात 30 बोलेरो गाड्या सामील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आमदारांच्या सुरक्षिततेसाठी वाहनाचा वापर - मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया फंडातून खरेदी करण्यात आलेली वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांच्या सुरक्षितेसाठी वापरण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गटाच्या सर्व आमदारांना वाय+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आलेली वाहने आमदारांच्या सुरक्षिततेसाठी वापरली जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका सुरु केली आहे.

शिंदे गटातील 40 आमदार, 12 मंत्र्यांना 'Y+' सुरक्षा -यंदा जुलैमध्ये, मोटार वाहन विभागाने मुंबई पोलिसांना एकनाथ शिंदे गटातील 40 आमदार, 12 मंत्र्यांना 'Y+' सुरक्षा देण्यासाठी 47 बोलेरो उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. व्हीआयपी सुरक्षा विभागाकडून तातडीने सुरक्षा व्यवस्था करण्याची ही विनंती करण्यात आली. त्यानंतर त्यांना दिलेल्या 47 बोलेरो पैकी 17 गाड्या परत आल्या. पण 30 गाड्या अजून परत आलेल्या नाहीत. Y+ स्तरावरील सुरक्षेमध्ये, एका वाहनासह पाच पोलिस कर्मचारी व्यक्तीच्या सेवेसाठी तैनात आहेत. ते चोवीस तास सुरक्षेसाठी तैनात असतात. नाव न सांगण्याच्या अटीवर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जूनमध्ये नवीन बोलेरो वाहने खरेदी केल्यानंतर ती वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांना देण्यात आली होती. ज्या पोलिस ठाण्यांमध्ये वाहने कमी आहेत. तेथील महत्वाचे काम थांबायला नको म्हणून गाड्या देण्यात आल्या आहेत.

Last Updated : Dec 11, 2022, 9:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details