महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

COVID19 : मुंबईत कलम 144 चे उल्लंघन... वाशी टोल नाक्यावर वाहनांची तपासणी - मुंबई बातमी

मुंबईच्या बाहेर विनापरवाना किंवा अपवादात्मक परिस्थिती नसतानाही बाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनांना वाशी टोल नाक्यावर पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. त्याठिकाणी प्रत्येक गाडीची तपासणी केल्यानंतर या गाड्या पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात येत आहेत.

vehicle-checking-at-vashi-check-point-in-mumbai
वाशी टोल नाक्यावर वाहनांची तपासणी

By

Published : Mar 23, 2020, 12:59 PM IST

मुंबई- कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच मुंबईतील रेल्वे, खासगी बसेस एसटी सेवा बंद केल्या आहेत.

वाशी टोल नाक्यावर वाहनांची तपासणी

हेही वाचा-जनता कर्फ्यूनंतर पुण्यात संचारबंदी, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 'पोलीस मैदानात'

मुंबईच्या बाहेर विनापरवाना किंवा अपवादात्मक परिस्थिती नसतानाही बाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनांना वाशी टोल नाक्यावर पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. त्याठिकाणी प्रत्येक गाडीची तपासणी केल्यानंतर या गाड्या पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात येत आहेत. मात्र, वाहन तपासणीसाठी थांबवल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details