मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसाचा लॉकडाऊन सुरू झालेला आहे. या काळात नागरिकांना भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार, आज शहराला सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. या संदर्भात शहरातील, भायखळा भाजी बाजाराचा आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी..
मुंबईत भाजीपाला बाजार सुरू; नागरिकांना दिलासा - corona thane
शहरातील दादर व भायखळा भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. तसेच आजपासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे देखील सर्व कामकाज नियमित करण्यात आले आहे. त्यामुळे, शहर व परिसरातील नागरिकांना नियमित भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू मिळणार आहे.
लॉकडाऊन कालावधीत शहराला भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी सांगितले होते. त्यानंतर आज शहरातील दादर व भायखळा भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. तसेच आजपासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे देखील सर्व कामकाज नियमित करण्यात आले आहे. त्यामुळे, शहर व परिसरातील नागरिकांना नियमित भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू मिळणार आहे.
हेही वाचा-#COVID 19 : पाडव्याच्या दिवशी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट