मुंबई- लॉकडाऊन संपेपर्यंत धारावीत फळे आणि भाजी विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. कोणताही विक्रेता किंवा फेरीवाला दिसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
धारावीत कोरोनाचे एकूण २२ रुग्ण आढळून आल्याने माहीम फाटक, आंध्रा वॅली रोड, धारावी माहीम रोड, धारावी क्रॉस रोड, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, कटारिया मार्ग, एकेजी नगर, मदिना नगर, चित्रनगरी आदी भाग बंद करण्यात येणार आहे. धारावीत कोरोनाचे रोज नवे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे, वरळी नंतर धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. धारावीत सध्या डॉ. बलिगा नगरमध्ये ५, वैभव अपार्टमेंटमध्ये २, मुकुंद नगरमध्ये ४, मदिना नगरमध्ये १, धनवाडा चाळमध्ये १, सोशल नगरमध्ये १, जनता कॉलनीमध्ये २, कल्याण वाडीमध्ये २, पीएमजीपी कॉलनीमध्ये १, मुर्गन चाळीमध्ये १ आणि तबलिगीचे २ असे एकूण २२ रुग्ण आहेत. त्यामुळे, धारावीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.