मुंबई - राज्यात मराठा आरक्षण, पदोन्नती आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण यासाठी उग्र आंदोलने केली जात आहेत. आता मुस्लिम समाजाच्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमीच्या वतीने सोमवारी (दि. 5 जुलै) मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे आझाद मैदानात आलेल्या कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
धार्मिक दंगलीबाबत कायदा
मुस्लिम समाजाने आमच्या 5 टक्के शैक्षणिक आरक्षण द्यावे तसेच धार्मिक दंगे पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी कायदा करावा या मागण्यांसाठी रजा अकादमी आणि वंचित बहुजन आघाडीने आज (सोमवार) आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या रेखा ठाकूर आणि फारुख अहमद यांच्या उपस्थित काढण्यात आला. यावेळी बोलताना, संविधानिक अधिकारानुसार सोमवारी आंदोलन करण्यात आले आहे. सर्वधर्म आणि धर्माच्या हक्काचे रक्षण करण्याचे आश्वासन बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला असताना धार्मिक प्रतीकांचा गैरवापर करून दंगली पेटवण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून होत आहे. या विरोधामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी 17 जून रोजी कायद्याच्या मसुदा जाहीर केला आहे. तो कायद्याचा मसुदा शिक्षक आमदार कपील पाटील हे विधानसभेमध्ये सादर करणार आहेत. सरकारने हा कायदा मंजूर करावा अशी आमची मागणी आहे, असे फारुख अहमद यांनी सांगितले.
मुस्लिम आरक्षण