महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेससोबतची राजकीय गुलामी संपली; यापुढील चर्चा केवळ समसमान पातळीवरच - प्रकाश आंबेडकर - प्रकाश आंबेडकर

यावेळी काँग्रेसला युती करायची असल्यास ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली असल्याचे ट्विट काँग्रेसला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे.

प्रकाश आंबेडकर

By

Published : May 26, 2019, 2:13 PM IST


मुंबई- लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचा अपवाद वगळता राज्यात वंचित बहुजन आघाडीचा दारूण पराभव झाला. तर आघाडीलाही त्यांचा मोठा फटका बसला. आघाडीला तब्बल ८ जागांवर पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे.

मात्र, यावेळी काँग्रेसला युती करायची असल्यास ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली असल्याचे ट्विट काँग्रेसला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे.

या लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीसोबत जागा वाटपावरून एकमत न झाल्याने युती झाली नाही. परिणामी वंचित बहुजनने स्वतंत्रपणे लोकसभा लढवली. निवडणुकीत अनेक मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने लाखांच्यावर मतं घेतली. वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळू शकली नाही. काही मतांच्या फरकामुळे ही संधी निसटली असल्याचेही यापूर्वीच्या ट्विट मध्ये म्हटले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्यात चर्चा करुन पुढील भूमिका घेतली जाईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details