मुंबई - विक्रोळी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ मोकळे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन वंचितचे नेते आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे वंचित आघाडीमुळे निवडून आले आहेत.
हेही वाचा - 'क्वात्रोची'ला पुजणाऱ्या पक्षाला 'शस्त्रपूजा' करणे नकोसे वाटणारच, भाजपची टीका
राज्यातील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाची आघाडी होती. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एमआयएमने वंचित बहुजन आघाडीची साथ सोडली. यामुळे वंचितवर याचे किती नुकसान होणार यावर बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, मुस्लीम समाजामध्ये असा एक समज झालेला आहे की वंचित बहुजन आघाडीमुळे समाजाला न्याय मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सर्व मुस्लीम समाज काँग्रेससोबत गेला त्यामुळे वंचित व एमआयएमच्या जागेला मोठ्या प्रमाणात फटका बसला. हाच मुस्लिम समाज औरंगाबाद मध्ये काँग्रेसला समर्थन न करता एमआयएमच्या जलील यांना जलील निवडून आले आहेत.