मुंबई- बहुजन वंचित आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वळचणीला गेले असल्याचा आरोप करणाऱ्या लक्ष्मण माने यांनी आठ दिवसात बाळासाहेब आंबेडकरांचे माफी मागावी. असे न केल्यास अब्रुनुकसानीचा खटला दाखल करून पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव डॉ. अंजरिया यांनी दिला आहे. शहरात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
लक्ष्मण माने यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करून पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. पडळकर आणि डॉ. अन्सारी यांच्यावरील आरोपाचा ८ दिवसात खुलासा करावा. असे न केल्यास थेट अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय पक्षांतर्गत शिस्तभंग केल्याप्रकरणी पक्षनेतृत्व लक्ष्मण मानेंवर कारवाई करेल, असा इशारा डॉ. अंजरिया यांनी दिला.