वसई : वसई विरार महानगर पालिकेची दोन दिवसांपासून अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईची ( action against illegal construction ) मोहीम सुरु असून पालिकेने पेल्हार परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली आहे. प्रभाग समिती एफ मधील पेल्हार धरणाजवळ असलेली 14 हजार स्कवेअर फूट एक माळ्याची आरसीसी बांधकाम केलेली इमारत जमिनदोस्त ( RCC constructed building ground level ) केली आहे.
Action on illegal construction : वसई विरार पालिकेची अवैध बांधकामावर कारवाई; अनधिकृत गाळ्यांची बांधकामे केली जमिनदोस्त - वसई विरार पालिकेची अवैध बांधकामावर कारवाई
वसई विरार पालिकेची 35 हजार स्कवेअर फूटाच्या अवैध बांधकामावर कारवाई ( action against illegal construction ) पेल्हार, विरार भागातील बेकायदा बांधकामांवर बुलडोजर ( Bulldozers on illegal constructions) बेकायदा बांधकाम व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली.
पालिका कर्मचाऱ्यांमार्फत निष्कनाची कारवाई : याच शिवाय विरार चंदनसार परिसरातील 5 हजार सक्वेअर फूटचे बांधकाम, पेल्हार भागातील दोन इमारती व वाकणपाडा परिसरात सुरु असलेल्या दोन हजार शंभर स्कवेअर फूट अनधिकृत गाळ्यांची बांधकामे पालिकेने जमिनदोस्त केली आहेत. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्या निर्देशानुसार पालिका उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली, पालिका कर्मचाऱ्यांमार्फत ही निष्कनाची कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने दाखवलेल्या या धडक कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रातील व्यवसायिकांमध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे.