मुंबई -एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले तेलगू कवी वरवरा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात असलेले ८० वर्षीय वरवरा राव यांची प्रकृती खालावत असून या संदर्भात राज्य सरकारने लक्ष देत, त्यांना वैद्यकीय चाचण्या व इतर उपचारांसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात यावे, अशी मागणी वरवरा राव यांच्या कुटुंबियांकडून ऑनलाईन पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या जामीनासाठी याचिका दाखल करण्यात आल्यानंतर यावर तातडीची सुनावणी आज (मंगळवार ) घेण्यात येत आहे.
वरवरा राव यांना काही वैद्यकीय चाचण्यांसाठी जे जे रुग्णालयात सोमवारी नेण्यात आले होते. या अगोदरही, विशेष न्यायालयात वरवरा राव यांच्या वकिलामार्फत प्रकृतीच्या कारणावरून जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. राव यांच्या जामीन याचिकेवर सरकारी वकिलांनी आक्षेप नोंदविला असता, सुनावणी दरम्यान विशेष न्यायालयाने वरवरा राव यांना जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात वरवरा राव यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.
वरवरा राव यांची जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव
एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले तेलगू कवी वरवरा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. रविवारी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या जामीनासाठी याचिका दाखल करण्यात आल्यानंतर यावर तातडीची सुनावणी आज (मंगळवार) घेण्यात येत आहे.
वरवरा राव यांची जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव