मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द केल्या असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. ९ वी आणि ११ वीचे पेपर १५ एप्रिलनंतर घेतले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच १० वीचे शिक्षक सोडून इतर शिक्षकांनी घरुनच काम करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. १० वी चे राहिलेल्या विषयाचे पेपर मात्र, वेळापत्रकारनुसारच होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. १ ले ८ वी पर्यंतच्या परीक्षा मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. ९ वी आणि ११ वी च्या परीक्षेचा निर्यण १५ एप्रिलनंतर घेतला जाणार आहे.
सीबीएसई आणि इतर केंद्रीय मंडळाने आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय घेतल्यानंतर आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. तसेच नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेतल्या जाणार असल्याचे जाहीर केले. दहावीच्या परीक्षेचे दोनच पेपर हे शिल्लक राहिले असल्याने ते नियोजित वेळात्रकानुसारच होतील. त्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याची माहितीही त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेते केली.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच शाळा- महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे. तर, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाजगी कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानेही बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली आणि आठवीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करून त्यांचा निकाल जाहीर केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. तसेच नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील. बारावीची परीक्षा १८ मार्च रोजी संपल्या असून दहावीच्या परीक्षेचे केवळ दोनच परीक्षा पेपर शिल्लक असल्याने त्यात कोणताही बदल केला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.