मुंबई- महाराष्ट्र हे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारावर चालणारे राज्य आहे. ते भारतीय संविधानाला प्रमाण मानतात. त्यामुळे या राज्यात असलेल्या नागरिकांमध्ये दुही पसरवणारा केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) कायदा लागू होऊ देणार नाही. याची नोंद केंद्रातील मोदी सरकारने घ्यावी, असे आव्हानच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री हेही वाचा -नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता निरीक्षकांचे निलंबन मागे
छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने रविवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात देशातील विविध विद्यार्थी संघटनांच्या मुख्य प्रतिनिधींची परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे राज्य महापुरुषांचे राज्य आहे आणि आता आमचे सरकार आहे. त्यामुळे या राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी लागू केली जाणार नाही, असे गायकवाड म्हणाल्या.
हेही वाचा - आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली रेसिंग कार टेकफेस्टच्या प्रदर्शनात
केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या सरकारने संविधान दिवसाच्या जाहिरातीत शब्द बदलला. परंतु, भारतीय संविधान यापुढेही मजबूत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.