महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. आंबेडकरांच्या ६३व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन - 63rd Mahaparinwan Day celebration in nashik

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

maha
६३व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

By

Published : Dec 7, 2019, 10:18 AM IST

मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा हा आढावा..

६३व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

बुलडाणा -महापरिनिर्वाण दिनाच्या संध्येला खामगाव आणि शेगाव शहरातील अनुयायांनी शहरातुन कँडल मार्च काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी, मोठ्या संख्येने शहरातील नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

चंद्रपूर -विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांच्या राष्ट्रीय कार्याबाबत ओढ निर्माण व्हावी, अभ्यासाची सवय व्हावी आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी यासाठी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल अशोसिएशन ऑफ इंजिनियर्स'च्या वतीने राज्यस्तरीय वैचारीक आभिवादन स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत विविध पुस्तकांवर आधारीत परिक्षा घेण्यात आली. शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

औरंगाबाद -भडकल गेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. शहरातील सर्व प्रमुख नेत्यांनी यावेळी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. याठीकाणी लागलेल्या स्टॉलवर शाळकरी मुलांना वही आणि पेनचे वाटपही करण्यात आले.

परभणी -महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्टेशन पुढे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अभिवादन करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून अनुयायांची रीघ लागली होती. सकाळी आठ वाजता बुद्धवंदना घेऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

लातूर -रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे जतन करण्यात आले आहे. नागपूरनंतर पानगाव हे अनुयायांचे मोठे प्रेरणास्थान मानले जाते. त्यामुळे मराठवाड्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेशचे अनुयायी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहतात. पानगाव येथे भीम गीत गायन आणि प्रबोधनपर व्याख्यान यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा -नागपूरमध्ये बाबासाहेबांना कवितांच्या माध्यमातून अभिवादन

जालना - सायंकाळी भोकरदन शहरातुन कँडल मार्च काढण्यात आला होता. याशिवाय सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सामुहिक पंचशील वंदनेचे आयोजनही करण्यात आले होते.

नाशिक - दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भीमसैनिकांना मनमाड शहरात रेल्वे स्थानकावर अन्नदान करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व ऑल इंडिया एससीएसटी असोसिएशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details