मुंबई :१० फेब्रुवारीपासून मुंबई ते शिर्डी व मुंबई ते सोलापूर अशा दोन ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही ट्रेन धार्मिक स्थळांना जोडण्याचे काम करत आहे. नवी मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस यात्रेकरूंना तुळजा भवानी मंदिरात जाण्यासाठी सुलभ कनेक्टिव्हिटी देईल. प्रत्येक डब्यात ५२ सीट आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासचे १०४ सीट आहेत. एकजिक्युटिव्ह आणि चेअर क्लास असे एकूण ११८८ सीट्स यामध्ये आहेत.
या मुळे ट्रेन खास :१८५३ मध्ये बोरीबंदर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिली ट्रेन चालवण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईमधून अशी ट्रेन पहिल्यांदा सुरु झाली आहे. या मार्गावर दोन घाट आहेत. या घाटांवर ट्रेनला मागून धक्का देण्यासाठी बँकर लावावे लागतात. या ट्रेनला तसे बँकर लावण्याची गरज पडलेली नाही. ती आपल्या गतीमुळे घाट पार करत आहे. दोन ट्रेन एकाच दिवशी सुरु होणे हे भारतात कधीही कुठेही झालेले नाही. ते मुंबईमध्ये झाले आहे. साडे पाच ते सहा तासात ही ट्रेन आपले अंतर पार करत आहे. या ट्रेनमध्ये १६ डब्बे आहेत. २ डबे एक्झिक्युटिव्ह क्लासचे आहेत.
किती तासात प्रवास होणार :वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ६.१५ वाजता रवाना होणार असून, दुपारी १२.१० वाजता शिर्डी येथे पोहोचेल. त्याच दिवशी ही एक्प्रेस शिर्डी येथून सायंकाळी ५.२५ वाजता रवाना होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ११.१८ मिनिटांनी एक्स्प्रेस मुंबईत पोहोचेल. या एक्सप्रेसने मुंबई ते शिर्डी अंतर पार करण्याठी ५ तास ३० मिनिटे लागणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ४.१० वाजता रवाना होणार आहे. सायंकाळी ७.१० वाजता पुणे येथे पोहोचेल. तर सोलापूरला रात्री १०.४० वाजता पोहचेल. रात्री ही एक्सप्रेस सोलापूर येथे मुक्काम करणार दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०५ वाजता रवाना होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी १२.३५ वाजता पोहचेल. या एक्स्प्रेसला मुंबई ते पुणे हे अंतर पार करण्यासाठी ३ तास तर मुंबई ते सोलापूर हे अंतर पार करण्यासाठी ६ तास लागत आहेत.