महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन - Mumbai

महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघातील मतदान मोजणी प्रक्रियेत वाढीव मतदान निदर्शनास आले आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडी या विषयावर आक्रमक झाली आहे. ईव्हीएम वर होणारी मतदान प्रक्रिया बंद करावी यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आज घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.

मुंबईत ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन

By

Published : Jun 18, 2019, 9:55 AM IST

मुंबई - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळाली पण हे बहुमत इव्हिएममध्ये घोळ करून मिळवले असल्याच्या आरोप वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आला होता. यामुळे ईव्हीएम मशीनवर बंदी आणावी आणि येणारी विधानसभेची मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे बांद्रा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

मुंबईत ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन

महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघातील मतदान मोजणी प्रक्रियेत वाढीव मतदान निदर्शनास आले आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडी या विषयावर आक्रमक झाली आहे. ईव्हीएम वर होणारी मतदान प्रक्रिया बंद करावी यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आज घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. बांद्रा जिल्हाधिकारी कार्यलयासनोर ही जोरदार आंदोलन करण्यात आले. भाजप सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

2019 मध्ये ईव्हीएम मशीनमधला घोळ समोर आला आहे. मतदानाच्या आकड्यामध्ये घोळ करून हे सरकार हे भाजप सरकार निवडून आले आहे. यामुळे येणाऱ्या काळात बॅलेट पेपर वर निवडणूक व्हावी यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत, असे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details