महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाड पूल दुर्घटनेत आई-वडील गमावलेल्या 'सावित्री'चे दहावीत उत्तुंग यश - महाड

आई-वडील ३ वर्षांपूर्वी अपघातात जग सोडून गेले. ज्या काकांनी दत्तक घेतले ते ही अल्पशा आजारानी दगावले. अशा विपरीत परिस्थीतीत वैष्णवीने हार न मानता, दु:ख बाजुला सारत दहावी बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवले

महाड पूल दुर्घटनेत आई-वडील गमावलेल्या 'सावित्री'चे दहावीत उत्तुंग यश

By

Published : Jun 10, 2019, 8:29 PM IST

मुंबई -तीन वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री नदीवरील पूल खचून मोठी जीवितहानी झाली होती. यात आई-वडील गमावलेल्या घाटकोपरच्या वैष्णवी वाजे हिने दहावी बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून दुःखावर मात केली आहे. तिला पुढे विज्ञान विषय घेवून 12 वी साठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी समाजाकडून सहकार्याची अपेक्षा आहे.

विपरीत परिस्थीतींवर मात करीत वैष्णवीने दहावी बोर्ड परीक्षेत मिळवले 92.60


आई वडील अचानक हे जग सोडून गेले. पोरकं झालेली भावंड त्यात वैष्णवीची जबाबदारी काकांनी घेतली. सोबत मोठ्या भावालाही घेतलं पण आई वडील नसल्याची जाणीव वेळोवेळी जाणवतच होती. पण वैष्णवीने हार न मानता, दु:ख बाजुला सारत दहावी बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवले.


महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिश कालीन पूल 2016 मध्ये रात्रीच्या वेळी खचून मोठी जीवितहानी झाली. यात कोकणातील संगमेश्वर येथील राहिवाशी सध्या घाटकोपर अमृतनगर येथील संतोष सीताराम वाजे व पत्नी संपदा संतोष वाजे हे मुंबईच्या दिशेने त्या रात्री सावित्री पुलावरून येत होते. पूल खचला आल्याची त्याना कल्पनाही नव्हती. हे दांपत्य सहकुटुंब संगमेश्वर येथील कार्य उरकून परतीला येत असताना खाजगी वाहनाने प्रवास करीत होते. हे वाहन नदी पात्रात वाहून गेले. वाजे दाम्पत्य आपल्या मुलांना मुंबईत घरी ठेवून गेले होते. त्यांनी आम्ही त्या रात्री उशिरा निघत आहोत अशी माहिती मुलांना दिली आणि ती रात्र या कुटुंबासाठी काळरात्र ठरली.


वैष्णवी संतोष वाजे हिने मुंबई बोर्डाच्या दहावी परीक्षेत यश संपादन केले पण दुःख काही साथ सोडत नाही. दत्तक घेतलेल्या काकांनीही काही महिन्यांपूर्वी हे जग सोडले त्यात काकूच आई वडील झाली.


मी ठरवले की आता आपल्यालाच चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाले पाहिजे त्यासाठी अभ्यास चांगला करून दुःख बाजूला केले. त्यामुळे हे मला यश मिळवता आले. या पुढे मला 12 विज्ञानसाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवायचा आहे व पुढे जे जे.महाविद्यालयातून पदवी घेण्याच स्वप्न आहे. त्यासाठी आजपर्यंत समाज, स्थानिक मंडळ यांनी मला मोलाचं सहकार्य केले. ते असेच पुढे माझ्या शिक्षणासाठी सहकार्य करावे ते मी चांगल्या गुणांनी सिद्ध करीन असे वैष्णवीचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details