मुंबई -राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे. मुंबईत सुरुवातीच्या टप्प्यात फक्त तीन खासगी रुग्णालयांना प्रशासनाकडून लसीकरणाची परवानगी देण्यात आली होती. आता ही संख्या तीनवरून 29 इतकी झाली आहे. यात मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात काही समावेश आहे. हिंदुजा रुग्णालय लसीकरणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे, रुग्णालयाचे सीईओ गौतम खन्ना यांनी सांगितले.
250 रुपये आकारणी -
आम्ही लसीकरणासाठी पूर्णपणे तयार आहोत. आमच्या रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची परवानगी आहे. आम्हाला तसा अनुभव आहे. आम्ही प्रोटोकॉल सेट केलेले आहेत. आमचा स्टाफ प्रशिक्षित आहे. आम्ही लाभार्थ्यांना लसीकरणासाठी पूर्णपणे तयार आहोत . सरकारकडून लस घेणार आहोत लाभार्थ्यांकडून 250 रुपये आकारुन त्यांचे लसीकरण केले जाईल. रुग्णालयाच्या क्षमतेच्या 50% लस ही ॲपद्वारे नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल. तसेच 50 टक्के लस वॉक इन येणाऱ्या लाभार्थ्यांना दिली जाणार आहे, असे सीईओ गौतम खन्ना म्हणाले.