मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीचा साठा नसल्याने गेले दोन दिवस लसीकरण बंद होते. मात्र, लसीचा साठा उपलब्ध झाल्याने आज शनिवारपासून मुंबई महापालिका व सरकारी रुग्णालयातील केंद्रांवर लसीकरण पुन्हा सुरू केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
लसीकरण बंद -
मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लसीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे दर दहा दिवसांनी मुंबईत लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहीम ठप्प पडत आहे. लसीचा साठा आल्यावर पुन्हा लसीकरण मोहीम सुरू केली जाते. ऑगस्ट महिन्यात १२, १३, १९ व २० ऑगस्ट या दिवशी लसीचा साठा नसल्याने लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली होती.