मुंबई -कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात आजपासून (१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबईत आजपासून १० केंद्रांवर या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
लसीकरण मोहीम -
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. १ मार्चपासून ४५ वर्षांवरील तसेच ६० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. मात्र, लसीचा पुरवठा होत नसल्याने या वयोगटातील लसीकरण राज्यात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच दरम्यान स्तनदा माता, परदेशात जाणारे विद्यार्थी, कामासाठी जाणारे नागरिक, ऑलम्पिकमध्ये जाणारे खेळाडू यांचे लसीकरण केले जात आहे.
हेही वाचा -मुंबईतील शिवस्मारक कार्यालयाची दुरवस्था; आमदार विनायक मेटे नाराज
असे करा लसीकरण -
राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणाचा टप्पा ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारने दिला आहे. त्यानुसार सरकारने ३० ते ४४ वयाचा गट तयार केला आहे. त्यांच्यासाठी आजपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. सोमवार ते बुधवार थेट येऊन लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवारी ते शनिवार कोविन अॅपवर बुकिंग करून लसीकरण केले जाणार आहे.
कोविन अॅपमध्ये बदल -
३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन अॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
हेही वाचा -महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचे झाले हसतमुखपणे लसीकरण
या ठिकाणी लसीकरण -
प्रियदर्शनी पार्क-वाळकेश्वर, बीएमसी मुरली देवरा आय हॉस्पिटल-कामाठीपुरा, कृष्ठरोग रुग्णालय-शिवडी, सेठ आयुर्वेदिक-सायन, बांद्रा भाभा, एम. डब्लू. देसाई-मालाड, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हॉस्पिटल-बोरिवली, जॉली जिमखाना-घाटकोपर, देवनार मॅटरनिटी होम (गोवंडी), वी. डी. सावरकर (मुलुंड)